हिशोब चुकता केला जाणार! एकाही देशद्रोह्याला सोडले जाणार नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं
Rahul Gandhi : हिशोब चुकता केला जाणार! एकाही देशद्रोहीला सोडले जाणार नाही अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

Rahul Gandhi : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचा मागणीसाठी नवी दिल्लीतील आकाशवाणी भवन परिसरात काँग्रेसने आंदोलन सुरु केले होते. आठ तास आंदोलन चालल्यानंतर दिल्ली पोलिसांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेते आणि समर्थकांना ताब्यात घेतले आहे. जवळपास 50 खासदार आआणि 250 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दो तासानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी सोडंलं आहे. दरम्यान, या घटनेवर राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हिशोब चुकता केला जाणार! एकाही देशद्रोहीला सोडले जाणार नाही अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
एकाही देशद्रोहीला सोडले जाणार नाही असे राहुल गांधी म्हणाले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधींनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली. लोकशाहीच्या देशद्रोह्यांना वाचवण्यासाठी लोकशाहीचे जे काही उरले आहे, ते कचराकुंडीत ओढले गेले आहे. याचा हिशोब चुकता केला जाईल; एकाही देशद्रोहीला सोडले जाणार नाही असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. दरम्यान, दोन तासांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी सोडले आहे. ते किंग्सवे कॅम्पमधून निघाले आहेत. ते एकाच गाडीतून निघाल्याचं पाहायला मिळालं.
विरोधी पक्ष मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची आणि मतदार याद्यांची विशेष सखोल पुनर्तपासणी (SIR) रद्द करण्याची मागणी करत आहेत. दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून काँग्रेस खासदार पवन खेरा, के. सी. वेणुगोपाल आणि अमरिंदर सिंग राजा वारिंग यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले. पोलिसांना रात्रभरच्या धरणे आंदोलनाची कुणकूण लागताच त्यांनी कारवाई सुरु केली आहे. खासदार राहुल गांधींसह यांच्यासह प्रियंका गांधी तसेच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे, खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
भाजपने राहुल गांधींच्या धरणे आंदोलनावर भाजपची टीका
भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, कोणत्याही पक्षाने निवडणूक आयोगाकडे भेटीची वेळ मागितली नाही. विरोधकांकडे आता बोलण्यासारखे काहीही उरलेले नाही; त्यांचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. राहुल गांधींना 300 लोकांना घेऊन निवडणूक आयोगाकडे जायचे होते, पण तिथे 300 लोकांसाठी जागा नाही. या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित नव्हते; राजेशाही प्रस्थापित करण्यासाठी रचलेला हा केवळ एक फार्स होता अशी टीका भाजपने केली आहे.
