महाराष्ट्र

थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार

आमची माती आणि संविधानासाठी आपण लढत राहू असा इशारा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

Aaditya Thackeray : शिवाजी पार्क (Shivaji Park)  परिसरात अनेक आंदोलन झाली आहेत. पण आज पाहिल्यांदाच शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. आमची माती आणि संविधानासाठी आपण लढत राहू असा इशारा ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी दिला आहे. रस्त्यावर आपण पाहिलच असेल बाचा बाची झाली आहे. ज्या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे, त्या सर्वांची सुटका होईपर्यंत आम्ही आंदोलन केल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार आहे. जे जे अधिकारी त्रास देतायत, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले

Aaditya Thackeray : दिल्लीमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कशासाठी?

उद्या दिल्ली मध्ये मोठा आंदोलन होणार आहे, मुंबईमध्येही आंदोलन होणार आहे. त्याची रुपरेखा आम्ही सोशल मीडियावर माहिती देऊ असे आदित्य ठाकरे म्हणाले. पोलिसांना केंद्रातून काही आदेश आलं आहे का? उद्या सर्व देशप्रेमी नागरिक रस्त्यावर उतरतील असेही ठाकरे म्हणाले. दिल्लीमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे. कशासाठी लावली आहे. जेवढं कौतुक मुंबई पोलिसांचं झालं, त्यामुळं केंद्र सरकारचं पोट दुखत असेल असेही ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!